• November 27, 2023

Investor Awareness Program

#अर्थसंवाद

प्रश्न : पर्सनल फायनान्स का शिकायला हवा ?

उत्तर : सोपं उत्तर म्हणजे शाळा आणि कॉलेजमध्ये शिकवलं नाही म्हणून. अर्थात अशा बऱ्याच गोष्टी शाळा कॉलेजमध्ये शिकवल्या नाहीयेत पण जगण्यासाठी पैसा लागतो, त्याचं व्यवस्थापन आपल्याला नीट शिकायलाच हवं. 

पैसा पाण्यासारखा असतो. पाण्यात मध्ये जर धरण बांधलं तरच ते पाणी एका ठिकाणी थांबतं. तसंच पैशाचंही आहे, त्याला थांबवलं तरच तो थांबेल. पण त्याला थांबवणार कुठे ? 


#अर्थसंवाद

प्रश्न : पर्सनल फायनान्स शिकण्यात अडचणी कोणत्या ?

उत्तर : 
मला त्यात इंटरेस्ट नाही.. 
मला त्यात कळत नाही .. 
आमचे हे सगळं बघतात.. 
माझ्याकडून पैसे खर्च होतात म्हणून ती सगळं बघते .. 

अशी वाक्य खूप ऐकायला मिळतात. पण हा विषय असा आहे की शाळेमध्ये आवडत नसलेला विषय असून सुद्धा काठावर का होईना पास व्हायला लागायचं तरच पुढच्या वर्गात जाता यायचं. तेच उदाहरण आपण इथे घेतलं तर आधीचं उद्दिष्ट (goal) पूर्ण झाल्याशिवाय पुढचं उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही हे आपल्या लक्षात यायला हवं आणि मुळात आपलं उद्दिष्ट काय आहे हेच लक्षात येत नाही. 

आता नेमकं उद्दिष्ट कसं ठरवायचं ? 


#अर्थसंवाद

प्रश्न : आधी वर्ल्ड कप आणि आता T-२० सिरीज चा माहोल आहे म्हणून विचारतेय, क्रिकेटमध्ये फर्स्ट इनिंग आवडते की सेकंड इनिंग ?

उत्तर : सेकंड इनिंग कारण त्यात टारगेट समजतं. किती धावा करायच्या आहेत ते लक्षात येतं. त्यापेक्षा एक धाव जर जास्त काढली तर आपण मॅच जिंकतो.  त्याच्यासाठी मर्यादित षटकं (Overs), मर्यादित खेळाडू(Players) आहेत हे लक्षात असतं. 

हीच गोष्ट पर्सनल फायनान्सच्या बाबतीत सुद्धा लागू आहे. गुंतवणूकीचं नक्की टारगेट किती आहे ते आपल्याला माहीतच नसतं. 

आपल्या सेकंड इनिंगसाठी किती टार्गेट आहे?


जाणून घेऊया .. 

तारीख : रविवार, ०३ डिसेंबर २०२३ 
वेळ : सकाळी १०.३० वाजता.
ठिकाण : घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व)  

Registration Form